काकड आरती माझा परमात्मा या बाबाची
 
 

॥श्री॥

॥बाबा॥

काकडा

काकड आरती माझा परमात्मा या बाबाची

जीवे भावे ओवाळीन मी, निजी निजात्मज्योतीने काकडा

मन, द्वैत, विकार, वासना फाडुनी मी काकडा वळला

नि:शेष घृतांत तो मी तिववला

निज चैतन्याची ज्योत ज्योतीने तो मी लावला

आत्मज्योत तेवली तेव्हा स्वच्छ प्रकाश फाकला

त्या ज्योतीला काजळीचा लवलेश ही नव्हता

त्या ज्योतीच्या प्रकाशाने अवनी अंबर अवघीप्रकाशीत झाली

उदय ना अस्त ना बाबांच्या त्या दिव्यांस मी ओवाळीला

काकड आरती माझ्या परमात्मा बाबाची…….

*****

 
 
 
Dear Baba Devotees, for any further communication, kindly contact us at amrutputra@babavanganiwale.org
प्रिय बाबा भक्ता हो, तुम्ही आमच्याशी पुढील पत्त्यावर संपर्क साधु शकता : amrutputra@babavanganiwale.org