बाबा प्रसाद
 

चैतन्यापर्यंतचा हा प्रवास ही एक सुरेख अनुभूती आहे आणि प्रत्येकाने मनाने ती घेतली पाहिजे. त्यासाठी मनाला जाणीव व्हायला हवी. जाणीव जितकी अधिक समृध्द तितकीच ती अनुभूती अधिक संपन्न. मनाची जाणीव व्यापक करण्यासाठी त्यावर साचलेली अनेक कोळीष्टके, जाळी दूर केली पाहिजेत. ही कोळिष्टके अनेक प्रकारची असतात. पूर्व संस्कारांची, पूर्व ग्रहांची, अर्धवट ज्ञानाची, गतआयुष्यातील घटनांची. ही सारी दूर झाली की आपोआप मनाची जाणीव समृध्द होते आणि मग या अनुभवातील गोडी लूटता येते. त्या अनुभूतीतील सार्थकता पटते. ती पटविण्यासाठी बौद्धिक तर्कवादाच्या कुबडया लागत नाहीत.

पण जोपर्यंत मन insensitive असते तोपर्यंत हा तर्कवाद खूप आकर्षित करतो. मनात शंका –कुशंकांचे मोहोळ उठत राहते . आणि त्यांचे योग्य निरसन न झाल्याने ते सतत अस्वस्थ, असमाधानी राहते. पण एकदा का सश्रद्ध शरणांगती स्विकारली की याच अस्वस्थ मनावर ज्ञानरूपी अमृताचा शिडकावा होतो आणि ते शांत होऊन जाते. आणि तेव्हाच ख-या अर्थाने तर्कवादाचा फोलपणा कळून चुकतो.


 
 
अमृतकुंभ
 
 
 
Dear Baba Devotees, for any further communication, kindly contact us at amrutputra@babavanganiwale.org
प्रिय बाबा भक्ता हो, तुम्ही आमच्याशी पुढील पत्त्यावर संपर्क साधु शकता : amrutputra@babavanganiwale.org