बाबांचा उद्देश्य असतो की त्यांच्या मुलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे. ’आत्मनिर्भर’ हा शब्द बाबा एका विशिष्ट अर्थाने वापरतात. त्याचा लौकिक अर्थ म्हणजे स्वावलंबी, दुस-यांवर अवलंबून न राहणारा. पण बाबा या शब्दाची व्याख्या वेगळयाप्रकारे करतात. ’आत्मनिर्भर’ म्हणजे तो जो स्वत:च चिदानंदाचा स्त्रोत आहे.आनंद मिळवण्यासाठी त्याला बाह्य जगावर किंवा स्वत:शिवाय इतर कोणावरही विसंबून रहावे लागत नाही. सुख शोधण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी तो वणवण भटकत फिरत नाही. नाना छंदांमध्ये, व्यसनांमध्ये त्याला अडकून पडावे लागत नाही.तो सर्वार्थाने स्वंयपूर्ण असतो. |